breaking-newsआंतरराष्टीय

लंडनमधील विजय मल्ल्याच्या घराची झडती होणार शक्‍य

  • कर्जांच्या वसुलीसाठी 13 बॅंकांच्या प्रयत्नांना मोठे यश

लंडन – भारतामध्ये कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्याच्या लंडनमधील घराची झडती घेतली जाऊ शकेल, असे लंडनमधील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतातील 13 बॅंकांच्या संघाने लंडनमधील उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने लंडनच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याबाबतची परवानगी दिली आहे.

लंडनमधील हर्टफोर्डशायर येथील मल्ल्याच्या घराची तपासणी केली जाऊ शकणार आहे. याशिवाय मल्ल्याचे सध्या वास्तव्य असलेल्या टेविन आणि विल्यनमधील लॉजचीही तपासणी केली जाऊ शकणार आहे. तब्बल 9 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी मल्ल्याविरोधात प्रत्यार्पण विषयीचा खटलाही सुरु आहे.

मात्र आज उच्च न्यायालयाने दिलेली ही परवानगी म्हणजे बॅंकांना त्यांच्या पैशांची वसुली करण्यासाठी या निवासस्थानांमध्ये जाण्याचे आदेश नाहीत. या परवानगीमुळे बॅंकांच्या संघटनेकडून 1,145 अब्ज डॉलरच्या वसुलीसाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक सुकर होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार अंमलबजावणी विभागाचे अधिकारी लॅडवॉक, क्‍वीन हू लेन, टेविन, वेल्विन आणि ब्रॅम्बल लॉजमध्ये जाऊ शकणार आहेत. तेथील वस्तू ताब्यात घेऊ शकणार आहेत. असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आवश्‍यकता वाटल्यास अधिकाऱ्यांना आपल्या अधिकारकक्षेमध्ये या निवासस्थानांमध्ये जाता येऊ शकेल.

मल्ल्याची जगभरातील मालमत्ता गोठवण्याच्या आदेशांना रद्द करण्यास लंडनमधील उच्च न्यायालयाने मे महिन्यात नकार दिला होता. तसेच भारतीय बॅंकांना मल्ल्याकडून वसुली करण्याचा हक्क असल्याचेही स्पष्ट केले होते. या वसुलीसाठी नियुक्‍त केलेल्या कर्ज वसुली लवादाला अधिकृत म्हणून मान्यही केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button