breaking-newsक्रिडा

रोहित, वेदांत, उमर, अदित्य, सुमित अंतिम फेरीत

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टियुद्ध स्पर्धा 
पुणे – मुलांच्या 36 किलो वजनी गटात साताऱ्याचा रोहित चौरसिया, पुण्याचा वेदांत बेगले, 38 किलो वजनी गटात पुणे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचा उमर शेख, साताऱ्याचा अदित्य जाधव, तर 40 किलो वजनी गटात अकोल्याचा सुमीत खरात यांनी चमकदार विजयाची नोंद करताना महाराष्ट्र राज्यस्तरीय पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टियुद्ध स्पर्धेतील आपापल्या गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

तसेच 60 किलो वजनी गटात पुणे सिटीचा चैतन्य कोलेकर, 63 किलो वजनी गटात नगर जिल्ह्याचा तेजस परखे, पुणे जिल्ह्याचा अन्वर मुजावर, औरंगाबाद सिटीचा रनवीर भोसले आणि मुंबई सिटीचा अनिस कडू यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र बॉक्‍सिंग संघटना, पुणे जिल्हा बॉक्‍सिंग संघटना आणि राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या बॉक्‍सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उपांत्य फेरीचा पहिला सामना 36 किलो वजनी गटात साताऱ्याचा रोहित चौरसिया आणि मुंबई उपनगरचा पवन यादव यांच्यात झाला. पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व राखत रोहित यांने पवन याचा 10-9 असा पराभव केला. याच गटातील दुसरा उपान्त्य सामना पुणे जिल्ह्याचा वेदांत बेंगळे आणि पुणे सिटीचा मल्हार कुलकर्णी यांच्यात झाला. यात वेदांतने मल्हारचा 10-9 असा पराभव केला.

याशिवाय 38 किलो वजनी गटात पुणे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचा उमर शेख यांने मुंबई उपनरगच्या नीरज राजभर याचा 10-9 असा पराभव केला. याच गटात साताऱ्याचा अदित्य जाधव यांने जळगाव जिल्ह्याच्या तुषार झनके याचा 10-8 असा पराभव केला. 40 किलो वजनी गटात अकोल्याचा सुमीत खरात यांनी मुंबई जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचा खेळाडू राहुल केवतचा पराभव केला. या गटात पुण्याच्या रोहितने धुळ्याच्या रोहित सोनावणेचा 10-9 असा पराभव केला. 42 किलो वजनी गटात साताऱ्याच्या पार्थ ढोणे यांने मुंबई सिटीच्या विवेक पिहल याचा पराभव केला.

याच गटातील दुसऱ्या सामन्यात अकोल्याचा प्रेक्षिक भालेरावने पुण्याच्या ओम पवार याचा 10-9 असा पराभव केला. 44 किलो वजनी गटात धुळ्याचा नयन सोनावने यांने नागपूरच्या यशराज कुलकर्णी याचा 10-9 असा पराभव केला. याच गटातील दुसरा सामना साताऱ्याचा निरंजन माने आणि नगरचा शुभम कारले यांच्या खेळला गेला. यात शुभम यांने निरंजन याचा 10-9 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दरम्यान 46 किलो वजनी गटात पुणे सिटीचा सनी कापसे, पिंपरी-चिंचवडा साहिल पांडगळे, पुण्याचा आयुष्य अवघडे, साताऱ्याचा कुणाल माने, 48 किलो वजनी गटात पुणे सिटीचा हजी अपराध, मुंबई उपनगरचा लकी श्रीवास्तव, क्रीडा प्रबोधिनीचा शाश्वत तिवारी, धुळ्याचा मनीष जाट, 50 किलो वजनी गटात ठाण्याचा राहूल सिंग यांनी उपान्त्य फेरी गाटली.

तसेच साताऱ्याचा सुमीत घाडगे, 52 किलो वजनी गटात क्रीडा प्रबोधिनीचा ओमकार चौगुले, साताऱ्या वेदांत कोकीळ, 60 किलो वजनी गटात पुणे सिटीचा चैतन्य कोलेकर, 63 किलो वजनी गटात नगर जिल्ह्याचा तेजस परखे, पुण्याचा अन्वर मुजावर, नाशिकचा अयान मणियार, 66 किलो वजनी गटात औरंगाबादचा रनवीर भोसले, अकोल्याचा करन वाहूरवाघ, साताऱ्याचा अभिवर्धऩ शर्मा आणि मुंबई सिटीचा अनिस कडू यांनीही उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button