breaking-newsआंतरराष्टीय

रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त राष्ट्राचे मोठे पाऊल

चिदॉंग – रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त राष्ट्रांकडून म्यानमार सरकारवर  दबाब वाढवण्यात येणार असल्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेश यांनी म्हटले आहे. यासाठी आम सभेमध्ये प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

View image on Twitter

António Guterres

@antonioguterres

In Cox’s Bazar, Bangladesh, I’ve just heard unimaginable accounts of killing and rape from Rohingya refugees who recently fled Myanmar. They want justice and a safe return home.

बांगलादेशमधील चिदॉंग येथील रोहिंग्या मुस्लिमांच्या शिबिराला गुटेरेश आणि संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी याठिकाणी आलेल्या विस्थापित रोहिंग्या मुस्लिमांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बांगलादेशाकडून या शरणागतांसाठी सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सेवाकार्यांचा देखील त्यांनी आढावा घेतला. यानंतर रोहिंग्यांच्या राखिने प्रांतातील पुनर्वसनाच्या कामाला गती देण्यात यावी, म्हणून प्रयत्न केले जातील आणि यासाठी आवश्यक पडल्यास म्यानमारवरील राजकीय दबाव देखील वाढवण्याची तयारी असल्याचे गुटेरेश यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button