breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

रोलबॉल फेडरेशन करंडक : राजस्थान, जम्मू काश्‍मीर, झारखंड संघांना पराभवाचा धक्‍का

  • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम संघांची विजयी सलामी

पुणे: महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व आसाम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेतील मुलांच्या गटात विजयी सलामी दिली. गुवाहाटीतील नेहरू स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे.

मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने राजस्थान संघाला 9-5 असे पराभूत करताना विजयी सलामी दिली. मिहीर सानेने 4, आकाश गणेशवाडे व आदित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी 2, तर शुभम पाटीलने एक गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजस्थान संघाकडून हिमांशू लांबा व बी. विजय यांनी प्रत्येकी 2, तर मानवेंद्रसिंगने 1 गोल करताना चांगली लढत दिली. मध्यंतराला महाराष्ट्र संघाने राजस्थान संघावर 4-2 अशी आघाडी घेतली होती.

मुलांच्या गटात उत्तर प्रदेश संघाने जम्मू काश्‍मीर संघाला 11-2 असे एकतर्फी पराभूत करताना विजयी सलामी दिली. उत्तर प्रदेश संघाच्या गोविंद गौरने 5, तर सचिन सैनीने 3 गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हेमंत यादवने 2, तर खेतान सैनीने 1 गोल करताना गोविंदला सुरेख साथ दिली. जम्मू काश्‍मीर संघाकडून दमन रखवालने 2 गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला उत्तर प्रदेश संघाने जम्मू काश्‍मीर संघावर 3-1 अशी आघाडी घेतली होती.

मुलांच्या गटातील अटीतटीच्या लढतीत आसाम संघाने झारखंड संघाला 3-2 असे पराभूत केले. आसाम संघाच्या संजीबकुमारने 2, दीपज्योतीने 1 गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. झारखंड संघाकडून अनुराग मुजुमदार व मुकेश मुखी यांनी प्रत्येकी 1 गोल करताना दिलेली लढत अपुरी ठरली. मध्यंतराला झारखंड संघाने 2-1 अशी आघाडी घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button