breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

रेल्वे स्थानकावर क्राॅसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्वर-पुणे एक्सप्रेसवर दरोडा

पुणे –  सोलापूर कडून पुण्याच्या दिशेला जाणारी भुवनेश्वर-पुणे या अतिजलद एक्सप्रेस जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर क्रॅासिंगसाठी थांबली असता चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी एका महिला प्रवाशासह एकूण चार जणांकडील ५६ हजार रुपयांचा ऐवज लुटला. गुरुवारी (सात फेब्रुवारी) हा प्रकार घडला.

दौंड लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पहाटे तीनच्या दरम्यान भुवनेश्वर-पुणे अतिजलद एक्सप्रेस रेल्वे क्रॅासिंगसाठी जिंती रेल्वे स्थानकावर थांबली होती. याचा फायदा घेऊन दोन चोरट्यांनी जनरल डब्यातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटले. नागम्मा मलप्पा कोडी (वय ४०, रा. बांदरवड, जि. कलबुर्गी) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाइल व रोख रक्कम काढून घेण्यात आली. अशोककुमार शंकर प्रधान (वय २६, रा. काळेवाडी, पिंपरी), श्रीकांत सुभाष गायकवाड (वय २७, रा. उस्मानाबाद) आणि रियाज बाबू शेख (वय २१, रा. अनदूर, ता. तूळजापूर) या इतर तीन प्रवाशांकडील १३ हजार रूपयांची रक्कम व त्यांच्या बॅगा लांबविल्या. चोरी करताना चोरट्यांनी चेहरा रुमालाने झाकला होता. तसेच त्यांचे दोन साथीदार डब्याबाहेर थांबले होते. या प्रकरणी नागम्मा कोडी यांनी पुणे स्थानकात तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी हा गुन्हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button