breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रेल्वेवरील दगडफेक रोखण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम

पुणे – गेल्या काही दिवसात चालू रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. दगडफेकीमुळे गाडीतील प्रवाशांच्या जीवाला धोका पोहचत असून ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटना चिंताजनक असून यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.

लोहमार्गाच्या शेजारी असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये पॅम्पलेट, पोस्टर वाटून लोकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. आकुर्डी, देहूरोड, घोरावाडी दरम्यान रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वाढल्या असून ही चिंतेची गोष्ट आहे. प्रवाशांच्या जीविताला यामुळे धोका पोहोचत असून या पट्ट्यात रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.

अशा घटना रोखण्याकरिता स्थानिक पोलिसांना देखील हाताशी धरले जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेल्वेवर दगडफेक करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर अनेक कलमे लावली जाणार असून त्यांना अटक देखील करण्यात येऊ शकते, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button