breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेडझोन परिसरात प्लाॅटची विक्रीस सर्रासपणे सुरु

पिंपरी ( महा ई न्यूज ) – रेड झोन आणि खडी मशिन झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत बांधकाम करता येत नाही. मात्र काही इस्टेट एजंट जमीन विक्रीची जाहिरात सर्रास करत आहेत. कमी दरात गुंठेवारी आकारून एक गुंठ्यापासून ते अकरा गुंठ्याचे प्लॉट खरेदी सकट देण्याच्या भूलथापांना व अशा बोगस जाहिरातबाजीला सर्वसामान्य बळी पडत आहेत.

सर्वसामान्य कामगार वर्ग बेकायदा प्लॉट खरेदी करत असून, रेड झोन आणि ग्रीन झोनमधील प्लॉटविक्री करण्यास लॅण्डमाफिया आता चांगलेच सोकावले आहेत. त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे सामान्य कष्टकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे. काही कुटुंब देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

काही वर्षांपासून इस्टेट एजंटची टोळी दिघी, चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, खडी मशिन रस्ता, तळवडे, बोराडेवाडी, जाधववाडी या भागात कार्यरत आहे. ज्या जागेवर अधिकृतपणे बांधकाम उभे राहू शकत नाही आणि भविष्यात कधीही विकत घेतलेली जागा ग्राहकांच्या नावावर होऊ शकत नाही, अशी रेड झोन आणि ग्रीन झोनमधील जागा अनधिकृतपणे ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सर्व बेकायदा प्रकाराला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button