breaking-newsक्रिडा

रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा: नेस वाडिया आणि नौरोसजी वाडिया संघांचे विजय

पुणे- नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर संघर्षपूर्ण विजय मिळवत रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील वरिष्ठ (सीनियर) मुलांच्या गटात विजयी आगेकूच नोंदवली.

डेनोबिल्ली कॉलेज ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स संघाने द बिशप्स को-एज्युकेशन स्कूल, कल्याणीनगरचा 2-1 ने पराभव केला. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सकडून अभिषेक जाधव (7 मि.) आणि दिनेश सुतार (45 मि.) यांनी, तर बिशप्स स्कूलकडून ध्येय राव (10 मि.) याने गोल केला. यानंतर प्रोडिगी पब्लिक स्कूलने एअर फोर्स स्कूलवर 3-1ने विजय मिळवला. यात प्रोडिगी पब्लिक स्कूलकडून निश्‍चल भारद्वाज (8 मि.), आयुष तन्वर (18 मि.), तनिष्क शर्मा (28 मि.) यांनी गोल केले, एअर फोर्स स्कूलकडून सुमन्यू अलोन (40 मि.) याने गोल केला. तिसऱ्या लढतीत नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स संघाने भारतीय जैन संघटना संघाचा 2-1ने पराभव केला. यात नौरोसजी वाडिया कॉलेजकडून राजू राम (9 मि.) आणि अमीर राठोड (22 मि.) यांनी गोल केले, तर भारतीय जैन संघटना संघाकडून एकमेव गोल यश देशमुखने (6 मि.) केला.

ज्युनियर मुलांच्या गटात स्टेला मॅरिस स्कूलने डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूलवर 2-1ने मात केली. यात आर्यन कांचनने (16 मि.) स्वयंगोल केला, चैतन्यने 20व्या मिनिटाला गोल करून स्टेला मॅरिस स्कूलला विजय मिळवून दिला. पूनावाला स्कूलकडून ऋत्विक सनसने (50 मि.) गोल केला.

सविस्तर निकाल : ज्युनियर मुले – स्टेला मॅरिस स्कूल – 2 (आर्यन कांचन 16 मि. (स्वयंगोल), चैतन्य 20 मि.) वि. वि. डॉ. सायप्रस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल – 1 (ऋत्विक सनस 50 मि.).
1) सीनियर मुले – नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स – 2 (अभिषेक जाधव 7 मि., दिनेश सुतार 45 मि.) वि. वि. द बिशप्स को-एज्यु स्कूल, कल्याणीनगर – 1 (ध्येय राव 10 मि.). 2) प्रोडिगी पब्लिक स्कूल – 3 (निश्‍चल भारद्वाज 8 मि., आयुष तन्वर 18 मि., तनिष्क शर्मा 28 मि.) वि. वि. एअर फोर्स स्कूल – 1 (सुमन्यू अलोन 40 मि.). 3) नौरोसजी वाडिया कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स – 2 (राजू राम 9 मि., अमीर राठोड 22 मि.) वि. वि. भारतीय जैन संघटना – 1 (यश देशमुख 6 मि.).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button