breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिंग केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका – नगरसेवक तुषार कामठे

आयुक्तांना दिले पत्र, मे. कृष्णाई, मे. मातेरे आणि मे. धनेश्वर या ठेकेदारावर कारवाईची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्रमांक 25 मधील 30 मीटर रोड भूमकर चाैक या कामासाठी 24 कोटी 44 लाख रुपयाची निविदा भरण्यात आली. या कामामध्ये मे. कृष्णाई इन्फ्रा, मे मातेरे आणि मे. धनेश्वर या तीन ठेकेदारांनी स्वतः रिगं केलेली असून ते काम मे. कृष्णाई इन्फ्रा या ठेकेदारास देण्यात आले. त्यामुळे सदरील रिंग केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधील 30 मीटर रोड भूमकर चाैक कामासाठी सुमारे 24 कोटी 44 लाख रुपये काम काढण्यात आले. त्या कामाचे स्थापत्य विभागाने दुसरे पाकीट उघडले असता, मे. कृष्णाई इन्फ्रा याच ठेकेदारास पुन्हा सदरचे काम रिंग करुन मिळाले आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिकारी मे. कृष्णाई इन्फ्रा, मे. मातेरे आणि मे. धनेश्वर या तीन ठेकेदारांनी विविध कामांमध्ये एकमेकांमध्ये रिंग करुन सर्वसामान्य करदात्या जनतेच्या कोट्यावधी रुपयाची लूट सुरु केली आहे. हे सर्व ठेकेदार महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्या आर्थिक संगणमताने कामे करु लागले आहेत. यापुर्वीही आयुक्तांना पत्र देवून सदरील काम रिंग करुन निविदा भरली आहे. याविषयी जाणिव करुन दिली होती. तरीही महापालिका आयुक्त डोळे झाकून बसले आहेत.

दरम्यान, सदरील रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, तसचे या कामामध्ये मे. कृष्णाई इन्फ्रा, मे मातेरे आणि मे. धनेश्वर या तीन ठेकेदारांनी स्वतः रिंग करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी महापाैर राहूल जाधव , सभागृह नेता एकनाथ पवार यांच्यासह आयुक्तांकडे केली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button