breaking-newsराष्ट्रिय

राहुल गांधींचे वडील राजीव गांधींबाबत भावनिक ट्विट

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 27वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने राहुल गांधी यांचे पुत्र आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भातील भावनिक ट्विट केले आहे. ”जी लोकं तिरस्कारासोबत जगतात, त्यांच्यासाठी तिरस्कार हा एखाद्या कारागृहाप्रमाणे असतो. अशी शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली. त्यांनी मला सर्वांना प्रेम आणि आदर द्यायला शिकवले. एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेली ही सर्वात मौल्यवान भेट आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांचे आभार मानतो”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी पुढे असेही म्हटले की, ‘आम्हा सर्वांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या हृदयातील तुमचे स्थान कायम तसेच राहिले”.  दरम्यान, राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता.

Rahul Gandhi

@RahulGandhi

My father taught me that hate is a prison for those who carry it. Today, on his death anniversary, I thank him for teaching me to love and respect all beings, the most valuable gifts a father can give a son.

Rajiv Gandhi, those of us that love you hold you forever in our hearts.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button