breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल शर्यत स्पर्धा

– शिवभक्त पतसंस्था व आम आदमी पार्टीचे आयोजन 
पिंपरी ( महा ई न्यूज )- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आम आदमी पार्टी आणि शिवभक्त पतसंस्थेच्या वतीने रविवारी (दि.2) सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवभक्त नागरी सहकारी पतसंस्था व आम आदमी पार्टीकडून पिंपरी चिंचवडच्या केएसबी चौकात सायकल शर्यत स्पर्धा घेण्यात आली. ही सायकल स्पर्धा  12/15/18 वर्षाखालील आणि खुला अशा दोन गटात मुले आणि मुली यांच्या स्वतंत्र वयोगटात आयोजित केली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांचे हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून भुजंग दुधाळे उपस्थित होते.  विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना अजिंक्य शिंदे म्हणाले की, मुलांनी आणि पालकांनी शिक्षणाबरोबर खेळाची आवड ही जोपासायला हवी, यामधूनच देशाला नवीन खेळाडू मिळतील.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून बिरू भोजने यांनी काम पाहिले. राष्ट्रीय पातळीवरील सायकलपटू व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडाशिक्षक शैलेंद्र पोतनीस, आप युवा जिल्हाध्यक्ष चेतन बेंद्रे,  उपाध्यक्ष  प्राजक्ता देशमुख, संगमेश्वर शिवपुजे, चंद्रकांत खोचरे, उमाकांत बिरादा, कैलास भैरट, सरस्वती कनजे, सावन राऊत, अरविंद देवगडे, यशवंत कांबळे , आणि राज चाकणे आदी उपस्थित होते
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button