breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थ्यांचे यश      

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अबॅकस गणित विषयाच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले आहे. शालेय स्तरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

आयडियल अबॅकस इंडिया या खाजगी संस्थेकडून बेंगलोर येथे राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गुणाकार, भागाकार, वजाबाकी व इतर गणिताची सूत्रे सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी शिक्षण दिले जाते. तर, विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. या स्पर्धेत देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ही स्पर्धा बेंगलोर येथील इंटरनॅशनल आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरच्या भव्य प्रांगणात घेण्यात आली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड येथील राहटणी परिसरात अबॅकस क्लासेसच्या संचालिका अंजली थोरात यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले. स्पर्धेत कृष्णा मानकापुरे याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या ट्रॉफीचा मान मिळविला आहे. तर, आर्य गाजरे, निलय कोठावदे यांनी प्रथम. ध्रुव वाकचौरे, कौशल चौगुले, सिद्धी भांडारकर, श्रेयस पांडे, कणाद कणसे, सारांश जैन व अथर्व पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर, शौर्य रसाळ, शांभवी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. श्रेया झोपे हिने पाचव्या क्रमांकाने स्पर्धेत यश मिळविले.

स्पर्धेतील विजेत्यांनी पिंपरी-चिंचवडचे नाव देशपातळीवर उंचावल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांना पिंपळे निलख येथील स्थानिक नगरसेविका आरती चोंधे यांनी अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थी, पालक व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button