breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रवादीला धक्का, विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार

  • वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये उद्या प्रवेश

अकलूज – माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील उद्या (बुधवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुत्र रणजितसिंह पाटील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भरगच्च मेळाव्यात घोषणा केली. रणजितसिंह मोहिती पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच्या गरवारे क्लबमध्ये साडेबारा वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहितीही रणजीतसिंह यांनी दिली. यावेळी रणजितने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे असं विजयसिंह मोहिती पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अखेर बंडाचं निशाण फडकवलंय. लोकसभेसाठी तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने मोहिते पाटील आता हातावरचं घड्याळ सोडून कमळ हातात घेण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी आपल्या ‘शिवरत्न’ बंगल्यावर कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविला. या मेळाव्याला दहा हजार कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना  कार्यकर्त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना स्वतंत्र निर्णय घेत भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि राष्ट्रवादीत उपेक्षा होत असल्याची खंत बोलून दाखवली.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांची भाषणं झालीत, त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर उघड उघड टीका केली. भाजपच्या चिन्हावर माढा लढवा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवाराचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्रीपदही पवारांनी त्यांना दिले होतं. मात्र नंतर त्यांच्यात मतभेद होत गेले.

दरम्यान, राष्ट्रवादी ची स्थापना झाली तेव्हाच विजयदादांना काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका, म्हणून विनवणी करत होते, तेव्हाच दादांना मुख्यमंत्री पद देऊ अस सांगण्यात आलं होतं पण दादा पवारसाहेबांसोबत राहिले. 2009 ला माढा मधून पवार उभे राहिले मोठं मताधिक्य विजयदादांनी दिल आणि जेव्हा मोदीची लाट होती तेव्हा दादांना उभं केलं इतक्या विरोधी वातावरणात ही माढाची सीट दादांनी राखली. पण पवारांनी  नंतर दादांना डावलून पवारांनी अनेक नेते माढ्यात फिरवले. रणजित दादांच्या नावाला पवार कुटुंबीयांनी विरोध केला. राष्ट्रवादीच्या उभारणीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांच योगदान मोठं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button