breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या शहर युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषत: युवकांची संघटना बळकट करण्यासाठी सर्वेसर्वा अजित पवार यांनी स्वतः लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी यांचा मुलगा योगेश गवळी यांना पिंपरी चिंचवड शहर  युवक कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

पुणे येथे बुधवारी (दि. ९) अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड आजी-माजी नगरसेवकांची आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेत चाललेल्या चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्यात व बुथ कमिटी नेमण्यात युवकांनी जास्त योगदान देण्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी पक्षाचे जीव तोडून काम करणारे युवक कार्यकर्ते एकत्र करण्याची जबाबदारी युवकांची आहे. त्यामुळे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या बरोबर काम करण्यासाठी युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड केली आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, नाना काटे, पंडीत गवळी, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संजय वाबळे आदी सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button