breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीची निदर्शने: मुख्यमंत्र्यांचा पोलिस प्रशासनावर वचक राहिला नाही – संजोग वाघेरे

पिंपरी (महा ई न्यूज) –  भाजपा सरकारच्या काळात देशातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली असून राज्यातील मुख्यमंत्र्याचा पोलिस प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपवर टिका केली.

कासारवाई येथील दोन मुलींवरील बालत्कार, पिंपरी एचए मैदानात सापडलेला सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आणि एकूण मुही व महिलांची निर्माण झालेली असुरक्षितता, याच्या निषेधार्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवार (दि. २८) दुपारी तीनच्या सुमारास पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, चार दिवसांपूर्वी रमाबाई आंबेडकर, पिंपरी येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून  तिचा निर्घृनपणे खून करण्यात आला. एचए मैदानातील झुडपात तिचा मृतदेह काल पोलिसांना मिळाला. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. मागील दहा दिवसांपूर्वी कासारसाई हिंजवडी या ठिकाणी उस तोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केला. त्यातील एकीचा मृत्यू झाला आहे. हे कृत्य करून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत नराधमांची मजल जातेच कशी काय? त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही. तसेच, राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्र्यांचा पोलिस प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला दिसून येत नाही. जे असे घाणेरडे कृत्य करतात त्यांना पकडून त्वरीत फास्ट ट्रॅक कोर्टातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, असेही वाघेरे म्हणाले.

ज्या ठिकाणी महिला, मुली यांचा अधिकचा वावर आहे. त्याठिकाणी महिला पोलिसांची नेमणूक झाली पाहिजे. भाजपाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झाला. वास्तविक पाहता पोलिस प्रशासन राज्य सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे. महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्य शासन याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे याबाबतचे निवेदन शहरातील महिला व युवती विभागाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवतींना देण्यात येणार आहे. तुम्ही एक महिला असून राज्यातील महिलांची बाजू तुम्ही मुख्यमंत्र्यांना दररोज सांगावे. त्यांच्या पत्नी म्हणून ते एखादे वेळेस पाठपुरावा करतील, हीच अपेक्षा आहे, असेही वाघेरे म्हणाले.

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक शाम लांडे, विजय लोखंडे, सुनिल गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, देवी थोरात, शकुंतला भाट, कविता खराडे, मिना मोहिते, अशोक कुंभार, सलीम सय्यद, आनंदा यादव, गंगा धेंडे, शिला भोंडवे, मेघा पवार, शमा सय्यद, मेघना जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, पोपट पडवळ, सविता खराडे, अभिजीत आल्हाट, ऋषीकेश वाघेरे, प्रशांत वाघेरे, जिमी बोत्रे, विजय दळवी, गोरक्ष पाषाणकर, विक्रम पवार, सुनिल अडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button