breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचा विरोध फटकारून संतपीठाला महापौरांची मंजुरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चा विषय महापौर राहुल जाधव यांनी विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच उपसूचनेसह मंजूर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात आक्रमक होत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच सभा तहकूब न करता महापौर जाधव आसन सोडून निघून गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला.

जानेवारी महिन्याची तहकूब सभा आज सोमवारी (दि. 4) घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या असनासमोरील हौदात आंदोलन केले. नगरसेवकांनी संत पीठात भ्रष्टाचार झाल्याचे फलक हातामध्ये घेतले होते. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, राजू बनसोडे, समीर मासुळकर, माजी महापौर मंगला कदम, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर सहभागी होते.

विरोधी पक्षनेते दत्ता साने संतपीठाच्या विषयावर बोलत होते. या कामाच्या निविदा प्रक्रियेतील रिंगबाबत बोलत असताना माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यांना मध्येच रोखले. साने यांनी संत पीठावर बोलावे, असे काळजे म्हणाले होते. रिंगबाबत बोलू देत नसल्याचे लक्षात येताच साने आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांच्या असनासमोर धाव घेतली. महापौरांसोबत जोरदार वादावादी सुरू असताना महापौर जाधव यांनी अचानक संतपीठाचा विषय मंजूर केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभा तहकूब केल्याचे जाहीर न करताच महापौर राहुल जाधव यांनी खुर्ची सोडली. सभा एक तासासाठी तहकूब केल्याचे नगरसचिवांनी जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button