breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेतला कंटेनर नदीत कोसळला

रावेत – बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला. या अपघातात ट्रेलर च चालक जखमी झाला असून देहूरोड येभील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष विठ्ठल वुधवंत (रा. नागलाता, ता आष्टी, जि बीड) असे जखमी झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे .

बंगळूरु -मुंबई  महामार्गावरून कात्रज बाजूने भरधाव वेगात आलेला ट्रेलर रावेत -पूनावळे दरम्यान पवना नदीवर असलेल्या मुख्य व सेवा रस्त्याच्या पूलाच्या  सिमेंट कठड्याला धडकून दोन्ही पूलांच्या मधून पवना नदीपात्रात कोसळला . ट्रेलर व त्यावरील कंटेनर पात्रात पडल्याने मोठा आवाज झाल्याने रावेत परिसरातील युवकांनी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून जखमी चालकाला देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात पाठविले असून जखमी चालकावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.अपघात पाहण्यासाठी महामार्गाच्या  दोन्न्ही बाजूच्या पूलांवर ये-जा करणारी वाहने थांबवून वाहनचालक व इतर लोक येत असल्याने वारंवार वाहतुक कोंडी होत होती .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button