breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावण सम्राज्य टोळीतील दोन गुन्हेगारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • निगडी परिसरात गुन्हे शाखेची कारवाई
  • देशी बनावटीचे पिस्टल, काडतूस केले जप्त

पिंपरी – निगडी आणि चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार मोक्कातील आपल्या फरार मित्राला देशी बनावटीचे पिस्टल देण्यासाठी निगडीत येणार होते. याची माहिती माहिती कळताच पोलिसांनी या दोन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊच्या सुमारास केली आहे.

रुतिक रतन रोकडे (वय 19, रा. चिंतामणीनगर, चिखली, पुणे), सचिन दीपक लोखंडे (वय 21, रा. भाऊसाहेब रोकडे चाळ, चिखली, पणे) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रुतिक आणि सचिन दोघेजण निगडी येथील अंकुश चौकात येणार असून त्यांचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आहे. आणि ते पिस्टल मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या त्यांच्या मित्रास देणार असल्याची माहिती पोलिसांना कळाली होती. त्यानुसार निगडीतील अंकुश चौकात पोलिसांनी सापळा रचला. दोघांनाही अंकुश चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हे दोघेही रावण साम्राज्य टोळीचे हस्तक असून त्यांच्यावर यापूर्वी वाकड, निगडी, चाकण, चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळे, गणेश पाटील, हवालदार कैलास बाबडे, प्रमोद लांडे, प्रविण दळे आदी कर्मचा-यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button