breaking-newsराष्ट्रिय

रावण दहन करताना भीषण रेल्वे अपघात, ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती

अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात झालेल्या अपघातामुळे ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. चौडा बाजार परिसर भागात दसरा असल्याने रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते. रावण दहन करतानाच ही दुर्घटना घडली. अनेक लोक जखमी झाले आहेत. पंजाब येथील चौडा बाजार परिसरात हा घटना घडली. ट्रेन पठाणकोटहून अमृतसरला येत होती. त्यावेळी ही ट्रेन रावणाच्या पुतळ्याला धडकली आणि एकच अफरातफर माजली. अनेक लोक जखमी झाले आहेत त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दूरदर्शनने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मतदार संघातच ही घटना घडली. त्यामुळे या घटनेनंतर सिद्धू हाय हाय च्या घोषणाही देण्यात आल्या. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

दूरदर्शन न्यूज़

@DDNewsHindi

अमृतसर में बड़ा ट्रेन हादसा, कई लोगों के मरने की आशंका

ANI

@ANI

: Several feared dead as a train runs into a burning Ravan effigy in Choura Bazar near Amritsar: More details awaited

या दुर्घटनेत नेमके किती लोक मारले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रावण दहन करण्यात आले, त्याचवेळी ट्रेन आली. त्यामुळे जे लोक रावण दहन पाहात होते त्यांच्यात एकच गदारोळ माजला. सध्या मैदानात सर्वत्र प्रेतं पडली आहेत असेच चित्र आहेत. कोणाचाही कोणालाही ताळमेळ नाही.  ट्रेन अत्यंत वेगात आली, त्यामुळे जे लोक ट्रॅकवर रावणदहन पाहण्यासाठी उभे होते ते मारले गेले असेही काही प्रत्यक्ष दर्शी म्हणत आहेत. सुमारे ३०० लोक या मैदानात रामलीला पाहात होते. त्यावेळीच अचानक ट्रेन आली. आताही या मैदानात गर्दी झाली आहे. या घटनेत सुमारे ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे. नेमके किती लोक मारले गेले याचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. लोकांचा आक्रोश, महिलांचा टाहो, किंकाळ्या याने हा सगळा परिसर भरून गेला आहे. अनेक लोक आत्ताही शोक व्यक्त करत आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

: An eyewitness says, a train travelling at a fast speed ran over several people during Dussehra celebrations, in Choura Bazar near Amritsar

ANI

@ANI

: Police says, “There are more than 50 casualties. We are evacuating people, injured taken to the hospital”, on accident in which several are feared dead in Choura Bazar near Amritsar

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button