breaking-newsराष्ट्रिय

राफेल प्रकरणात हवाई दलप्रमुख खोटं बोलत आहेत : काँग्रेस

राफेल प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी हवाई दलप्रमुख बी एस धनाओ यांच्यावर निशाणा साधला आहे. हवाई दलप्रमुख सत्य लपवत असून ते खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राफेल व्यवहाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. त्यांचा हा निर्णय सरकारच्या अहवालावर आधारित आहे, आणि सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटा अहवाल दिला आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच राफेल प्रकरणी सत्य उजेडात आणल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ANI

@ANI

Veerappa Moily, Congress: In govt records, Defence Ministry & IAF Chief wanted HAL to be involved. IAF Chief at that time visited HAL with Dassault & found it competent & that they have the expertise. I think IAF chief is not fine, he’s lying, he’s suppressing the truth

१६३ लोक याविषयी बोलत आहेत

ते म्हणाले, संरक्षण मंत्री, वायू दलप्रमुखांना हिंदुस्तान ऍरोनॉटिकल लि.ला (एचएएल) या व्यवहारात सामील करुन घ्यायचे होते, याची सरकारी अहवालात नोंद आहे. वायू दलप्रमुखांनी दसॉच्या प्रमुखांबरोबर एचएएलचा दौरा केला होता. या दौऱ्यात ऑफसेट कंपनीसाठी एचएएल सक्षम असल्याचे मानले होते. मला वाटतं या मुद्द्यावर हवाई दलप्रमुखांचे मत योग्य नाही. ते सत्य लपवत असून खोटं बोलत आहेत.

वायू दलप्रमुख धनाओंनी बुधवारी राफेल विमानांचे कौतुक करताना हे लढाऊ विमान भारतासाठी निर्णायक सिद्ध होणार असून याचा रणनीतिक फायदा होईल असे म्हटले होते.

मोईली म्हणाले की, राफेल व्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो सरकारच्या अहवालावर आधारित आहे. सरकारचा हा अहवालाच खोटा आहे. राहुल गांधी यांनी देशासमोर हे सत्य आणले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक केले पाहिजे. राफेल हा या शतकातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button