breaking-newsमनोरंजन

राज कपूरवरील बायोपिकबाबत रणबीर कपूर चर्चेमध्ये

शो मॅन राजकपूरवरील बायोपिक बनवावा असा विचार आपण करणारही नाही, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. रणबीर कपूर स्वतः संजय दत्तच्या बायोपिकमध्ये आहे. आता राज कपूरवरील चित्रपटातही रणबीर कपूरनीच लीड रोल करावा, अशी चर्चा होते आहे. याबाबत रणबीर कपूरला विचारले असता आपली पर्सनॅलिटी आजोबा राज कपूर यांच्याशी जरी मिळती जुळती असली तरी आपण त्यांच्या रोलसाठी योग्य आहोत की नाही, हे सांगता येत नाही.

राज कपूर यांच्यावर बायोपिक बनावा अशी रणबीरची देखील ईच्छा आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घटना आहेत, त्या चित्रपटातून हटवल्या जायला हव्यात. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये गुणांबरोबर अवगुणही असू शकतात. मात्र यामुळे जर कपूर खानदानाला अडचण होणार असेल, तर स्वाभाविकच या सिनेमासाठी परवानगी मिळणे अवघड आहे. जर कपूर कुटुंबाने परवानगी दिली तर हा बायोपिक खूप चांगल्या तऱ्हेने बनवला जाऊ शकतो, असे रणबीरने सांगितले. मात्र या बायोपिकमध्ये तो स्वतः राज कपूर यांचा रोल साकारण्यास तयार आहे की नाही, याचे उत्तर देणे मात्र त्याने टाळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button