breaking-newsक्रिडा

राज्यात १८ नोव्हेंबरला ‘महावॉकेथॉन’ स्पर्धा

  • विक्रम नोंदविण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट

मुंबई– राज्य शासनाचा परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, मोटार वाहन विभाग, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यस्तरीय ‘महावॉकेथॉन’ स्पर्धेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी दोन किलोमीटरच्या या स्पर्धेत राज्यातील दीड लाख शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांसह सहभागी होणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 20 लाख नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच धावपटूंसह कुटुंबातील सदस्यांनाही सहभागी होता येणार आहे.

ही वॉकेथॉन 150 ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी घेतली जाणार असून या स्पर्धेचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट आहे.

पनवेल येथे 500 तर अमरावती येथे 500 विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

18 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8 वाजता ही स्पर्धा सुरु होणार असून जागतिक विक्रम करण्याच्या आयोजकांचा मानस आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून दीड लाख विद्यार्थी त्यांच्या मित्र आणि पालकांसह स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा असून यांच्यामार्फत दररोज रस्ता सुरक्षा, नो हार्न, वाहन चालकांची जबाबदारी आणि त्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत समाजात जागरुकता निर्माण होईल असा विश्वास आयोजक डॉ. परेश शेठ, संचालक, सीएसआय ग्लोबल यांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सार्वजनिक बांधकाम व मोटर वाहन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून शासन आणि जनतेतील संबंध अधिक दृढ होणार आहे. या उप्रक्रमास राज्यभरातील शासकीय कार्यालये, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींचे सहकार्य लाभत असल्याचे सीएसआर डायरीचे संस्थापक डॉ.मितेज शेठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button