breaking-newsमहाराष्ट्र

राज्यात पत्रकारांनाही पेन्शन; राज्य सरकारची मंजुरी

मुबई –  पत्रकारांसाठी मासिक पेन्शन योजना सुरू करावी, या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर आज राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या व सलग २० वर्षे पत्रकार म्हणून सेवा बजावलेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ या नावाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही सभागृहात मांडण्यात येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पत्रकार सन्मान योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीतून पेन्शन सुरु करण्यात येणार आहे.

माहिती आणि जनसंपर्क विभागाने या पेन्शन योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. या योजनेनुसार वयाची ६० वर्षे पूर्ण केलेला व सलग २० वर्षे पत्रकार म्हणून सेवेत राहिलेला पत्रकार पेन्शनसाठी पात्र ठरणार आहे. या पत्रकाराला महिना १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button