breaking-newsआंतरराष्टीय

राज्यपाल बनले दूत, गर्भवती महिलेला आपल्या हेलिकॉप्टरमधून नेले रुग्णालयात

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी डी मिश्रा यांच्या समयसुचकतेमुळे एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार मिळाले. राज्यपाल मिश्रा हे गुरुवारी हेलिकॉप्टरमधून तवांग येथून ईटानगर दौऱ्यावर जात होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पेमा खांडू आणि स्थानिक आमदार यांच्यातील गर्भवती महिलेच्या प्रकृतीबाबत बोलताना ऐकले. त्यांनी त्वरीत त्या महिलेला आपल्या हेलिकॉप्टरने पुढील उपचारासाठी पाठवले. राज्यपाल मिश्रा यांच्या या कृतीमुळे एका गर्भवती महिलेला जीवदान मिळाले.

एका गर्भवती महिलेची स्थिती नाजूक असून तवांग आणि गुवाहाटीदरम्यान पुढील तीन दिवसांपर्यंत हेलिकॉप्टर सेवा नसल्याचे स्थानिक आमदार मुख्यमंत्री खांडू यांना सांगत होते. हे ऐकताच राज्यपाल मिश्रा यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधून गर्भवती महिला आणि तिच्या पतीला घेऊन जावू असे सांगितले. या दाम्पत्याला हेलिकॉप्टरमध्ये जागा मिळावी म्हणून राज्यपालांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना तवांगमध्येच सोडण्याचा निर्णय निर्णय घेतला.

हे प्रकरण इथेच संपले नाही. मिश्रा यांचे हेलिकॉप्टर आसाममधील तेजपूरमध्ये इंधन भरण्यासाठी उतरले. उड्डाण करण्यापूर्वी पायलटला हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. पायलटने हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकत नसल्याचे सांगितले. महिलेच्या प्रकृतीमुळे चिंतीत असलेल्या राज्यपालांनी तेजपूर येथील वायूसेनेच्या तळावरील कमांडिंग ऑफिसरकडून दुसरे हेलिकॉप्टर मागवले आणि महिला तसेच तिच्या पतीला तेथून रुग्णालयाकडे रवाना केले. नंतर काही वेळाने ते दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून पुढे गेले.

इतकेच नव्हे तर राज्यपाल मिश्रा यांनी ईटानगर येथील राजभवनातील हेलिपॅडवर एक स्त्री रोगतज्ज्ञाबरोबर रुग्णवाहिका तैनात करण्याची सूचना केली. राज्यपालांनी नंतर महिला आणि तिच्या बाळाला आशीर्वादही दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button