breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय हेव्यादाव्यांपोटी च-होलीतील गृह प्रकल्प भूमीपूजनाला “खोडा”

पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेचा पहिला प्रकल्प च-होली भागात साकारण्यात येणार आहे. चापेकर संग्रहालयाबरोबरच या गृहप्रकल्पाचेही भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घेण्याचे नियोजन महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे होते. मात्र, ऐनवेळी या नियोजनात काही बदल करण्यात आला आहे. आवास योजनेच्या प्रकल्पाचे भूमीपूजन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याने नियोजनात बदल केल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. 21) सांगितले. मात्र, राजकीय हेव्यादाव्यांपोटी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून आवास योजना प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ वगळण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात शनिवारी (दि. 21) सुरू होती.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी (दि. 23) क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर च-होली येथे होणा-या पंतप्रधान आवास योजनेतील गृह प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही घेण्यात येणार होता. तसे नियोजनही पालिकेतील भाजपच्या पदाधिका-यांनी केले होते. मात्र, ऐनवेळी या नियोजनात बदल करण्याचा निर्णयही तत्क्षणी घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना पुण्यामध्ये पुढील कार्यक्रमासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची वेळ मिळाली नसल्याचे कारण भाजपचे काही पदाधिकारी सांगत आहेत. तर, या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. भाजप नेत्यांमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमाबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे पक्षांतर्गत उलटसूलट चर्चा सुरू आहे.

 

आवास योजनेचा च-होलीतील प्रकल्प भोसरी विधानसभा मतदार संघात येतो. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमीपूजन घेण्यासाठी स्थानिक आमदार महेश लांडगे यांची संम्मती नसल्यामुळे पालिकेच्या नियोजनातून हा कार्यक्रम वगळण्यात आल्याची चर्चा राजकीय पदाधिका-यांत केली जात आहे. त्यामुळेच आमदार लांडगे आजच्या पत्रकार परिषदेलाही उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच, आगामी भोसरी विधानसभेसाठी भाजपकडून महेश लांडगे यांच्यासह पक्षनेते एकनाथ पवार इच्छुक आहेत. दोघांपैकी कोणाला पक्षाचे तिकीट मिळणार हा मुद्दा जरी सध्य परिस्थितीत दुय्यम असला, तरी मुख्यमंत्र्यांच्या च-होलीतील पदस्पर्शाचा फायदा दोघांनाही होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. म्हणूनच च-होलीतील भूमीपूजनाचा कार्यक्रम वगळण्यात आल्याची चर्चा केली जात आहे. निष्ठावंत म्हणून पवार यांची भाजपशी जवळीकता असल्यामुळे भोसरीकरांच्या मनात पाल चुकचुकत आहे. गाववाल्यांच्या असंतोषात बाहेरच्याचा फायदा होऊ नये, अशी भावना भोसरीकरांच्या मनात घर करून राहिल्याने राजकीय समिकरणे घडोघडीला बदलू लागली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button