breaking-newsराष्ट्रिय

राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री

बंगळुरु: कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली आहे. कर्नाटक हे दक्षिणेकडील एकमेव राज्य आहे, जिथे भाजपने विजय निश्चित केला आहे. कर्नाटकातील भाजपचा हा दुसरा विजय ठरेल. यापूर्वी भाजपने 2008 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवत, दक्षिणेत पदार्पण केले होते. मात्र 2013 मध्ये भाजपने हे राज्य गमावले. आता पुन्हा 2018 मध्ये भाजपने सत्ता खेचून आणली. भाजपच्या दोन्ही विजयाचे आणि एका पराभवाचे श्रेय जाते ते बी एस येडियुरप्पा यांनाच. 2008 सालचा विजय, 2013 सालचा पराभव आणि 2018 सालचा विजय या सर्वांमधील समान धागा म्हणजे बी.एस. येडियुरप्पा होय.

बूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा म्हणजेच बी एस येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात झाला. 75 वर्षीय येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राईस मिलमध्ये क्लार्क ते मुख्यमंत्री अशी येडियुरप्पांची कारकीर्द आहे. त्यांच्या चढ्या कारकिर्दीला जेलवारीचा ब्रेकही लागला. मात्र त्यातूनही त्यांनी कमबॅक केले.

* राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री
* मांड्या जिल्ह्यातील कारपेट तालुक्यातील बुकानाकेरे गावात 1943 साली जन्म
* भात मील (rice mill) मध्ये क्लार्कचं काम करायचे. त्यानंतर
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव म्हणून काम
* 1972 मध्ये जनसंघाचे तालुका अध्यक्ष होते
* 1975 मध्ये आणीबाणीत 45 दिवसांचा कारावास
* 1983 मध्ये पहिल्यांदा आमदार बनले, शिकारीपुरा मतदारसंघातून सात वेळा विजय. (आजचा धरुन आठ)
* 1988 मध्ये कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष
* 1994 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता बनले, 1999 साली निवडणूक हरले पण विधानपरिषदेतून आमदार.
* 2004 मध्ये पुन्हा जिंकले आणि विरोधी पक्षनेता बनले, तेव्हा काँग्रेसचे धरमसिंह मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा आणि जनता दल सेक्युलरच्या कुमारस्वामी यांनी ते सरकार खाली खेचलं, 20-20 महिने विभागणी झाली. भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले, येडियुरप्पा उपमुख्यमंत्री, पण
त्यांची टर्म संपल्यावर कुमारस्वामींनी येडियुरप्पांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सातच दिवसात राजीनामा द्यावा लागला.
* 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली. भाजपने जिंकलेलं दक्षिणेतलं हे पहिलं राज्य ठरलं. येडियुरप्पा भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री बनले.
* खाण आणि जमीन घोटाळ्याच्या/भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन 2011 साली मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं.
* लोकायुक्तांच्या हस्तक्षेपामुळे जमीन घोटाळ्यात ऑक्टोबर 2011 साली अटक झाली, तेव्हा ते 23दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर 2012 मध्ये हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला.
* 2012 मध्ये येडियुरप्पांनी आमदारकीचा आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. 2013 च्या निवडणुकांत भाजपच्या पराभवाला हातभार लावला. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपमध्ये पक्ष सामील करुन घरवापसी केली.
* 2014 साली शिमोगा लोकसभा मतदारसंघातून साडेतीन लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून खासदार बनले.
*  2016 मध्ये पक्षाने त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पाठवलं आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button