breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्त्यावर धूळखात पडलेल्या वाहनमालकांना नोटीस द्या ; वाहतूक पोलिसांना महापाैरांच्या सुचना

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची महापालिकेत बैठक

 शहरात पार्किंग धोरणाची करणार अमंलबजावणी – महापाैर जाधव

पिंपरी ( महा ई न्यूज )- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, याकरिता गल्लोगल्ली धूळखात व बंद पडलेल्या वाहन मालकांना नोटीस देवून त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीत लवकरच पार्किंग धोरणाची अमंलबजावणी करुन पार्किंग व नो पार्किंग झोन फलक लावण्याच्या सुचना महापाैर राहूल जाधव यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या. 

महापालिकेच्या महापाैर कक्षात आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता वाहतूक नियोजनाबाबत बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त निलिमा जाधव, वाहतूक पोलिस निरीक्षक निंबाळकर उपस्थित होते. महापालिका हद्दी व लगतच्या भागातील वाहतुक सुरळीत होणे आवश्यक आहे. नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

शहरातील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटविणे आवश्यक आहे. बेवारस वाहनामुळे वाहतूकीचा कोंडीचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सर्व रस्ते खुला करण्यात यावे, शहरात पार्किंग व नो पार्किंगचे सर्वत्र फलक लावण्यात यावेत, पार्किंगबाबत योग्य ते धोरण राबवुन वाहनांना शिस्त लावण्यात यावे, बीआरटी मार्गावर रिक्षांना थाबा देवून नये, त्यांचे रिक्षा स्टाॅप बदलण्यात यावेत, वाहतूकीस अडथळा करणा-या रिक्षा चालकांवर कारवाई करा, सुचना महापाैर राहूल जाधव यांनी वाहतुक पोलिसांना केलेल्या आहेत.

दरम्यान, या बैठकीत वाहतुक पोलिस निरीक्षकांनी अडीअडचणी महापौरासमोर मांडल्या. अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांसाठी एकत्रित ठेवण्यास महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी बॅरीकेट्स  आणि जॅमरची मागणी करण्यात आली. बीआरटी मार्गावर अनावश्यक ठिकाणी रुट बंद करावेत, तसेच काही चाैकात सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करावी, यासह आदी मागण्या त्यांनी केल्या. या मागण्यांंवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापाैर जाधव यांनी दिले. यावेळी महापालिकेतील विद्युत, स्थापत्य व बीआरटीएस विभागातील अधिका-यांना वाहतुक शाखेसाठी आवश्यक ती मदत करणेबाबत सुचना दिल्या.

यावेळी नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, अनुप मोरे, परिवहन कक्ष प्रमुख श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता बीआरटीएस ज्ञानदेव जुधांरे, कार्यकारी अभियंता विद्युत गिलबिले,  उप अभियंता परिवहन कक्ष विजय सोनवणे,  कनिष्ठ अभियंता परिवहन कक्ष अनिल भोईर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button