breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्त्यावर थुंकणा-यांची आता गय नाही, पालिकेची दंडात्मक कारवाई

पिपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महापालिकेनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्त्यावर तसेच सार्वजणिक ठिकाणी थुंकणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवार (दि. 15) पासून त्याची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणा-यांना आता चाफ बसणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या आठ प्रभागांत ही कारवाई करण्यात येत आहे. अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्त्यावर थुंकणा-या 9 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 1 हजार 350 रुपये दंडाची रक्कम आकारण्यात आली आहे.  क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी रस्त्याच्या बाजुला अथवा मुख्य चौकात दबा धरून बसत आहेत. पाण टपरी, बाजापेठ, हॉटेल, पीएमपी बस स्थानके अशा सार्वजणिक ठिकाणी थुंकल्याचे निदर्शनास येताच, पालिकेचे अधिकारी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. तसेच, थुंकलेली जागा संबंधित व्यक्तीकडून स्वच्छ करवून घेतली जात आहे.

त्याचबरोबर सार्वजणिक ठिकाणी कचरा टाकण्यासही पालिकेने आता मनाई केली आहे. तरीही, काही लोकांकडून अशा ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार बंद होत नसल्याचे दिसते. अशा व्यक्तींच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय स्वच्छ भारत अभियान विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता रस्त्यावर कचरा टाकणा-या व्यक्तींना दंड आकारला जात आहे. अ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात अशा 24 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 हजार 320 रुपये आकारण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button