breaking-newsआंतरराष्टीय

रशियावरील निर्बंधांवरून अमेरिकेने भारताला वगळले

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक, 2019 पारित केले आहे, त्यामुळे भारताच्या रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी झाली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्‍यता आता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिका रशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादते.

या विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील 231 ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून एस-400 मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल. अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button