breaking-newsमहाराष्ट्र

रविवार ठरला घातवार, विविध अपघातात ९ जणांचा मृत्यू

नाशिक,  मुंबई-आग्रा महामार्गावर दोन आयशर टेप्मोंची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळगाव बसवंत शिवारात हा अपघात झाला.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात झाला. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण मृत्युमुखी, तर तिघे जखमी झाले आहेत. लग्न सोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणाऱ्या ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button