breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पांना बहुमताची शंभर टक्के खात्री

बंगळुरु – कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाने दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. येडियुरप्पांनी आम्ही 100 टक्के बहुमत सिद्ध करुच, असा दावा केला आहे. या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, कॉंग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही 7 जागा कमी पडत आहेत.

कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्याची वाट मोकळी करुन दिली आहे. यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचे बळ आहे. यामुळे भाजप अडचणीत आला आहे. तो बहुमत कसे सिद्ध करणार याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button