breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

युवक काँग्रेसची निवडणूक रद्द

पुणे – काँग्रेस भवन येथे बुधवारी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या वेळी मतदानासाठी आधार कार्ड दाखविणे सक्तीचे होते; परंतु ते दाखविण्याच्या मुद्यावरून केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि मतदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. त्याचे पर्यवसान धक्काबुक्की आणि खुर्च्या भिरकावण्यात झाले. त्यामुळे निरीक्षकांनी निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिवाजीनगर येथील काँग्रेसभवनमध्ये कसबा विधानसभेच्या युवक आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मतदान घेतले जात होते. या वेळी निवडणूक नियमावलीनुसार मतदार ओळखीचा पुरावा आधार कार्ड सोबत घेऊन येणे बंधनकारक केलेले होते. या वेळी केंद्रीय निरीक्षकांनी काही मतदारांना स्मार्ट आधार कार्ड दाखविण्यास सांगितले. काही मतदारांनी ते दाखविले; परंतु मूळ आधार कार्ड दाखवल्याशिवाय मतदान करू देणार नसल्याचे सांगताच त्यावरून मतदानासाठी आलेले कार्यकर्ते व निरीक्षकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. त्याचे पर्यवसान धक्काबुक्की आणि खुर्च्या भिरकावण्यामध्ये झाले. त्यामध्ये मोबाईल व टेबलावरील लॅपटॉप फुटला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निरीक्षकांनी निवडणूक रद्द करून तेथून निघून गेले. या घटनेनंतर काँग्रेस भवन परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button