breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

युती होवूनही मावळात खासदार बारणे- आमदार जगताप यांच्यात सूत जूळेना

– भाजप-शिवसेनेचं जमेना, वाद पार्थ पवारांच्या पथ्यावर?

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली, मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना युतीची बैठकीला भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दांडी मारली. दोन्ही पक्षाच्या समन्वय मेळाव्यास पालकमंत्री गिरीष बापट आणि निलम गो-हेसह शहराचे संपर्क प्रमुखही उपस्थित होते. त्यामुळे लोकसभेला भाजप-शिवसेनेची युती होवूनही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील वैर आजही संपले नसल्याचे जाहीर दिसून आले.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवार) आकुर्डीत पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या भाजप-शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीकडे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठ फिरवली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि आताचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी असणारे शीतयुद्ध जगतापांनी कायम असल्याचे दिसून आले.

या बैठकीच्या आधी दिवंगत आणि गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पिंपरी चिंचवड भाजप शहर कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. तेथे आमदार जगताप उपस्थित होते. मात्र, तिथून बैठकीला येण्याऐवजी त्यांनी मोबाईल बंद ठेवून बैठकीला पाठ फिरवली.

दरम्यान, मावळ लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारी लागा, असा आदेश दिला आहे, असे संभाव्य शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button