breaking-newsमनोरंजन

‘या’ मालिकेतून मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हे मन बावरे’ मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरू होत आहे. यामध्ये ‘बिग बॉस मराठी’ स्पर्धेत टॉप ५पर्यंत पोहोचलेली स्पर्धक अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतसुद्धा झळकणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Colors Marathi

@ColorsMarathi

प्रेम मिळता बहरून जाते, सुखाच्या सरीने काहूर होते, हे मन बाबरे… घेऊन येत आहोत नवी मालिका 9 ऑक्टोबरपासून वर.@dusanismrunal @shashank_ketkar

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button