breaking-newsमनोरंजन

“या’ ड्रेसमुळे प्रियंका ट्रोल

बॉलीवुडसह हॉलिवुडमध्येही यशस्वीपणे स्वतःची ओळख निर्माण करणारी “देशी गर्ल’ अर्थात प्रियंका चोप्राला फॅशन आणि स्टाईलमध्ये टक्‍कर देणे एवढे सोपे नाही. मात्र, प्रत्येकवेळीच ड्रेस आणि स्टाईलची प्रशंसा मिळविणाऱ्या प्रियंकाला यावेळी ट्रोलला सामोरे जावे लागले.

प्रियंकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. ज्यात तिने पेस्टल ब्ल्यू कलरचा लॅंग ब्लेजरमध्ये एकदम हॉट अंदाजात दिसते. मात्र, या ड्रेसच्या वरील भागात असलेल्या कटमुळे हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या फोटोची अनेकांनी खिल्ली उडवीत प्रियंकाला ट्रोल केले.

हा ड्रेस न्यूयॉर्कमधील बेस्ट डिझायनर डियान ली हिने डिझाईन केले आहे. भलेही या ड्रेसमध्ये प्रियंका खूपच कॉन्फिडेंट आणि कम्फर्टेबल दिसते. मात्र, हा ड्रेस पाहून अनेक सोशल यूजर्सने वेगवेगळ्या विनोदी आणि अश्‍लील कॅमेंट्‌स पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, प्रियंका चोप्राला काही दिवसांपूर्वीच चित्रिकरण करत असताना पायाला दुखापत झाली होती. सध्या ती “क्वांटिको’च्या तिसऱ्या भागाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती पुन्हा बॉलीवुडमध्ये एन्ट्री करणार असून सलमान खानसोबत “भारत’ चित्रपटात काम करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button