breaking-newsमनोरंजन

‘या’ अभिनेत्रीचं सोशल मीडियावर सिक्रेट अकाऊंट ?

सोशल मीडियापासून दूर असलेली बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या चर्चेत आली आहे. करिनाला बॉलिवूडमधील सर्व गोष्टींची माहिती असते. तिला ‘गॉसिप क्वीन’ देखील म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये कोण काय करतंय, कोणाचं भांडण सुरू आहे, या गोष्टींची करिनाला माहिती असते, असा खुलासा एका चॅट शोदरम्यान दिग्दर्शक करण जोहर यानं केला होता.

करिना कपूरचं इन्स्टाग्रामवर सिक्रेट अकाऊंट असल्याची चर्चा सुरू आहे. कारण ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हिला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या सेलिब्रिटीला सोशल मीडियावर फॉलो करायला आवडतं? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं करिना कपूरचं नावं घेतलं. या आधी देखील करिनाला अनेकदा सोशल मीडियावर कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे. पण करिनाला सोशल मीडियावर येण्यात काहीच रस नसल्याचं तिनं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button