breaking-newsपिंपरी / चिंचवड

यशवंतराव चव्हाण स्मारकाला पाच कोटीचा निधी देण्यास मान्यता

पिंपरी – यशवंतराव चव्हाण स्मारक समितीतर्फे निगडी, प्राधिकरणात कै. यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. याबाबतच्या ठरावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मान्यता दिली. यावर अंतिम निर्णय महासभा घेणार आहे.

कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणीकृत संस्था आहे. या समितीमार्फत पिंपरी महापालिकेच्या हद्दीत निगडी, प्राधिकरण येथे यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये गोरगरीब, अनाथ व अपंगासाठी अभ्यासिका, वसतिगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे आर्थिक मदत करण्याची विनंती यशवंतराव स्मारक समितीने केली होती. त्यानुसार पालिका पाच कोटी रुपयांची मदत करणार असून त्याला स्थायी समितीने मंजूर देऊन महासभेकडे शिफारस केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button