breaking-newsमनोरंजन

..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी

सहसा एखाद्या सेलिब्रिटीची लग्न असलं की त्याआधीपासूनच बरेच दिवस त्याच्या तयारीची, पाहुण्यांच्या यादीची विविध कार्यक्रमांची चर्चा होण्यास सुरुवात होते. पण, अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदी यांचा विवाहसोहळा मात्र या साऱ्याला अपवाद ठरला. नेहा आणि अंगदने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ बांधली. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप विवाहबंधनात अडकल्याने ही जोडी बरीच चर्चेत होती. मुळात नेहा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपविषयीसुद्धा फार कमी लोकांना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाचं वृत्तं हे अनेकांनाच धक्का देऊन गेलं. त्यातच नेहाच्या गरोदरपणामुळे घाईत लग्न आटपलं का असा प्रश्न उपस्थित केला गेला. गेल्याच महिन्यात नेहाने गरोदर असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. अंगद आणि नेहाने सहा महिन्यांपर्यंत ही बातमी का लपवली यामागचं कारण आता स्वत: नेहाने स्पष्ट केलं आहे.

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं. ‘मी जाणीवपूर्वक माझ्या गरोदरपणाची बातमी लपवली. माझ्याबद्दलची लोकांची वागणूक बदलेल की काय, मला काम मिळणं बंद होईल की काय अशी भीती मला वाटत होती. सुदैवाने सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझं बेबी बम्प दिसलं नाही. याचा मला फायदा झाला. मी जास्त उत्साही असल्याने यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चं शूटिंग संपवलं,’ असं तिने सांगितलं.

 

गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर नेहा आणि अंगदने ‘लॅक्मे फॅशन वीक २०१८’ मध्ये एकत्र रॅम्पवॉक केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button