breaking-newsमनोरंजन

…म्हणून निककडून परिणितीला हवेत ३७ कोटी

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे दोघंही पुढील महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. अर्थात प्रियांकाच्या आईच्या इच्छेप्रमाणे पारंपरिक भारतीय पद्धतीनं तीन दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आता लग्न पारंपरिक पद्धतीनं होणार म्हटल्यावर प्रियांकाची बहिणी परिणिती भलतीच खूश आहे. कारण लग्नात तिला निककडून थोडे थोडके नाही तर चक्क ३७ कोटी रुपये मिळणार आहेत. आता एवढी मोठी रक्कम निक तिला का देणार आहे असा प्रश्न साहजिकच तुम्हालाही पडला असेलच तेव्हा परिणितीनं यामागचं कारण सांगितलं आहे.

पंजाबी लग्नात ‘जुता चुपाई’चा मजेशीर खेळ असतो . लग्नमंडपात नवऱ्यामुलीच्या बहिणी नवरदेवाच्या नवीन चपला लपवतात आणि त्याबदल्यात नवरदेवाकडे पैसे किंवा इतर भेटवस्तूची मागणी करतात. या रितीविषयी निक पूर्णपणे अनिभिज्ञ होता. तेव्हा निकला परिणितीनं जुता चुपाईबद्दल सांगितलं इतकंच नाही तर चपलांचे जोड लपवल्यानंतर मी त्याच्याकडून ३७ कोटी रुपये मागणार आहे असंही ती म्हणाली. विषेश म्हणजे निकनं तिला एवढी मोठी रक्कम देण्याचं कबुलही केलं असल्याचं तिनं सांगितलं, त्यामुळे परिणीती भलतीच खूश आहे.

‘नमस्ते इंग्लड’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिनं निक आणि तिच्यामध्ये झालेला हा गंमतीशीर संवाद सांगितला. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात निक आणि प्रियांकाचा विवाहसोहळा पार पडणार आहे विशेष म्हणजे हा सोहळा भारतातील जोधपुरमध्ये पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button