breaking-newsक्रिडा

मोहम्मद सलाह आफ्रिकेतील सर्वोत्तम खेळाडू

सेनेगल– इजिप्तच्या राष्ट्रीय फुटबॉंल संघ आणि इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघ लिव्हरपूल एफसीचा फुटबॉंलपटू मोहम्मद सलाह याला सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम आफ्रिकन खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत सेनेगल राष्ट्रीय संघ आणि लिव्हरपूलमधील त्याचा सहकारी खेळाडू सादीयो माने आणि आर्सेनलचा फुटबॉल क्‍लबचा पियरे एमरिक ऑबमेयांग हे फुटबॉलपटू होते.

सेनेगल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सलाह म्हणाला, मी लहान होतो तेव्हापासून हा पुरस्कार मिळावा हे माझे स्वप्न होते. सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळवल्याने मला समाधान आहे. सालाहने 2017 -18 या वर्षात लिव्हरपूलसाठी खेळताना विक्रमी 46 गोल झळकावित लिव्हरपूल चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोचवण्यात मोठी भूमिका बाजावली होती. मात्र अंतिम सामन्यात पहिल्या सत्रातच जायबंदी झाल्याने मैदानाबाहेर जावे लागल होते. तर इजिप्तला विश्वचषकाचे तिकीट मिळवून देण्यातही त्याचा वाटा मोठा होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button