breaking-newsमहाराष्ट्र

मोबाइल क्षेत्रात ‘दरयुद्ध’ भडकण्याची शक्‍यता

  • जिओच्या अवास्तव सवलतींना स्पर्धक कंपन्या उत्तर देण्याच्या तयारीत 

मुंबई -रिलायन्स जिओच्या स्वस्त डेटा प्लॅनला टक्‍कर देण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्या आपापल्या परीने नवनवे प्लॅन बाजारात आणत आहेत. टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलकडे मोठी स्पर्धक कंपनी म्हणून पाहिले जाते. याच एअरटेल कंपनीने आता 129 रुपयांचा आकर्षक प्लॅन लॉंच केला आहे. एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्लॅनचं मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना यामध्ये फ्री हॅलो ट्युन्स मिळतील. स्वस्त आणि मस्त अशा या प्लॅनची एअरटेलच्या ग्राहकांमध्ये उत्सुकता आहेच, त्याचबरोबर इतर ग्राहकांना काही प्रमाणात का होईना, पण आपल्याकडे खेचण्यात एअरटेल कंपनी यशस्वी होण्याची शक्‍यता वाढली आहे.

129 रुपयांच्या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना एक जीबी इंटरनेट डेटा, दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल अशा सुविधा मिळणार आहेत. मोफत हॅलो ट्युन्सही देण्यात येणार आहेत. 28 दिवसांच्या अवधीसाठी असलेला हा प्लॅन एअरटेलच्या काही ठरावीक सर्कलसाठी लॉंच करण्यात आला आहे. तुम्हाला या प्लॅनचा लाभ घेता येईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी एअरटेलच्या ऍपची मदत घेता येईल किंवा एअरटेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही कळू शकेल, असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. एअरटेलने लॉंच केलेल्या या प्लॅनसारखाच जिओचा 98 रुपयांमध्ये एक प्लॅन आधीपासूनच बाजारात आहे. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28 दिवसांच्या अवधीसाठी मिळतो. जिओच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्युन्सची ऑफर नाही, जी एअरटेलच्या प्लॅनमध्ये आहे आणि हेच एअरटेलच्या प्लॅनचे वेगळेपण आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी संचलित रिलायन्स जिओने पोस्ट पेड ग्राहकाना आपल्याकडे वळविण्यासाठी आणखी नवा प्लॅन सुरू केले आहे. त्यामुळे इतर काही स्पर्धात्मक प्लॅन सुरू करण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर जिओ एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ प्रमुख मुकेश अंबानी यानी सांगितले की, त्यांची कंपनी पुढच्या 10 वर्षांमध्ये एक इंटीग्रेटेड डिजिटल इंडस्ट्रियल एरिया निर्माण करणार आहे. कंपनी यावर 60,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. हा देशातील पहिला आपल्या पद्धतीचा डिजिटल इंडस्ट्रियल एरिया असणार आहे. अंबानींनी असाही दावा केला की चीनने जागतिक अर्थव्यवस्थेत मॅन्युफॅक्‍चरिंगमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. भारत सेवा क्षेत्रात हाच दबदबा निर्माण करू शकतो.

रिलायन्स आपल्या ग्लोबल पार्टनरसोबत मिळून येत्या 10 वर्षांत महाराष्ट्रात 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. हा देशातील पहिला इंटिग्रेटेड डिजिटल इंडस्ट्रियल एरिया असणार आहे. की रिलायन्स सोबत 20 ग्लोबल कंपनी हे पाऊल उचलत आहे. यामध्ये नोकिया, एचपी, डेल, सिस्को, सिमेंट सारख्या कंपन्या आहेत. गेल्या वर्षी रिलायन्स समूहाने मोबाइल सेवा पुरवठा क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील आर्थिक समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. उशिरा या क्षेत्रात येऊनही दिलेल्या सवलतीमुळे जीओला कोट्यवधी ग्राहक मिळाले आहेत. मात्र या सवलती अवास्तव असल्याचे स्पर्धकांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button