breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मोबाइल क्रमांकाच्या नोंदणीतही पुणेकर वीज ग्राहकांची आघाडी!

पुणे विभागात २६ लाख ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सुविधा

महावितरणकडे मोबाइलची नोंदणी करून ‘एसएमएस’द्वारे वीजबिल आणि इतर माहितीची सुविधा घेण्यातही पुणेकरांनी आघाडी घेतली आहे. पुणे शहर आणि परिमंडलातील २६ लाखांहून अधिक ग्राहकांना सध्या ‘एसएमएस’द्वारे माहितीची सुविधा पुरविण्यात आली आहे.

वीजबिलाचा तपशील, मीटरचे रिडिंगसह वीजबंदचा कालावधी आणि इतर माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाचे संकलन गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येते. पुणे परिमंडलामध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह इतर वर्गवारीतील २७ लाख २४ हजार वीजग्राहक आहेत. त्यातील सुमारे २६ लाख वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. विशेष म्हणजे एक लाख १४ हजार कृषिपंपधारकांपैकी सुमारे ९९ हजार ग्राहकांनीही मोबाइल क्रमांक नोंदविले आहेत. येत्या काही दिवसांत १०० टक्के मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बिलाची रक्कम, बिल भरण्याचा दिनांक, भरणा केल्यानंतरचा तपशील ग्राहकांना पाठविण्यात येत आहे.

मोबाइल क्रमांकाची नोंद कशी कराल?

महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी करायच्या मोबाइल क्रमांकावरून महावितरणच्या क्रमांकावर आणि त्यानंतर बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून एसएमएस केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंद होते. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहेत.

एसएमएस दाखवून वीजबिल भरा!

ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून वीजबिलांचा तपशीलही पाठविण्यात येत आहे. घरपोच वीजबिलाची प्रत येण्याची वाट न पाहता हा एसएमएस दाखवूनही वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणकडून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एसएमएस सेवा मराठीतून देण्याची मागणी केल्यास त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एसएमएसची भाषा मराठी करण्यासाठी MLANG (ग्राहक क्रमांक) १ तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) २ असे टाईप करून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button