breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मोदी हटाव, लोकशाही बचाव; मावळात 45 संघटना भाजप-शिवसेनेच्या विरोधात करणार प्रचार

– लोकशाही बचाव समितीची घोषणा
पिंपरी  –  लोकशाही बचाव समिती महाराष्ट्र राज्य वतीने भाजप-शिवसेनेच्या विरोधात मावळ लोकसभा मतदारसंघात मोदी हटाव आणि लोकशाही बचाव असा नारा दिला आहे. गेल्या पाच वर्षात दिलेले एक आश्वासन मोदी सरकारने पुर्ण केलेले नाही. देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत., युध्दजन्य परस्थितीमुळे जवानावर हल्ले वाढले आहेत. महिला-मुलीवर अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. युवकांना रोजगार नसल्याने बेरोजगाराचे प्रमाणही वाढले आहे. तसेच देशात संविधानाच्या प्रति जाळण्यात येत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही बचाव समितीने मोदी हटाव, लोकशाही बचाव असा नारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेला मारुती भापकर, मानव कांबळे, धनाजी येळेकर, सतीश काळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. लोकशाही बचाव समितीच्या वतीने भाजप-शिवसेनेच्या विरोधात 45 संघटना मैदानात उतरल्या आहेत. यामध्ये  मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, नागरी हक्क सुरक्षा समिती, जनसंघटना, सीपीआयएम,  बारा बलुतेदार महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, छावा मराठा युवा महासंघ, महाराष्ट्र परिट सेवा मंडळ, अपना वतन संघटना, भारतीय मायनॉरीटीज सुरक्षा महासंघ, विश्व कल्याण कामगार संघटना, नाभिक महामंडळ, लोकजागर संघटना, स्कूल युनियन, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, वडार समाज सेवासंघ, महाराष्ट्र फेरीवाले क्रांतीमहासंघ, तक्षशिला बुद्धविहार, अपंग सहाय्य संस्था, 1995 पेन्शनर्स संघटना, संत सेवा विकास मंडळ, संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना व विविध महिला बचतगट आणि इतर सामाजिक संघटना यांचा समावेश आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button