breaking-newsराष्ट्रिय

मोदी यांच्या मर्जीतील सीबीआय अधिकाऱ्याची मल्याला मदत

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

सीबीआयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष मर्जीतील एक अधिकारी असून त्याने मद्यसम्राट विजय मल्या याच्याविरुद्धची लूक-आूट नोटील कमकुवत केली आणि मल्या यास देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.

सीबीआयमधील सदर अधिकाऱ्याचे नाव ए. के. शर्मा असे असून ते गुजरात श्रेणीचे अधिकारी आहेत. मल्या याच्याविरोधातील लूक-आऊट नोटीस कमकुवत करण्यामध्ये शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे शर्मा यांनीच हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोपही राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे केला आहे.

सीबीआयचे सहसंचालक ए. के. शर्मा यांनी मल्याची लूक-आऊट नोटीस कमकुवत केली आणि त्याला पसार होण्यास मदत केली. शर्मा हे गुजरात श्रेणीचे अधिकारी असून ते मोदी यांच्या विशेष मर्जीतील आहेत. त्यांनीच नीरव आणि चोक्सी यांनाही मदत केली, अरेरे काय हा तपास, असे गांधी यांनी ट्वीट केले आहे.

बँकांचे कर्ज बुडविल्यानंतर मल्या यास देशाबाहेर पसार होण्यास नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप गांधी आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून मल्या कसा पसार झाला त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button