breaking-newsराष्ट्रिय

मोदी म्हणतात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ? बलात्कार पीडित तरुणीच्या आईचा सवाल

हरियाणामध्ये सीबीएसई टॉपरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेवाडी येथे ही घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ? असा संतप्त सवाल तरुणीच्या आईने विचारला आहे.

‘सीबीएसई बोर्डात टॉप केल्यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते माझ्या मुलीचा सन्मान करण्यात आला होता. मोदीजी म्हणतात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’….पण कसं ? माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे’, अशी मागणी पीडित तरुणीच्या आईने केली आहे. सोबतच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ANI

@ANI

Rewari: Woman alleges her daughter was kidnapped & gang-raped by a group of men yesterday, says, “Modi ji says ‘Beti Padho, Beti Bacho’, but how? I want justice for my daughter. Police has taken no action yet.”

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Rewari: Woman alleges her daughter was kidnapped&ganag-raped by a group of men y’day,says, “My daughter was rewarded by Modi ji after she topped the CBSE board exams. Modi ji says ‘Beti Padho, Beti Bacho’, but how? I want justice for my daughter. Police has taken no action yet. “

काय आहे प्रकरण ?
रेवाडी जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणी बेशुद्द होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. नंतर तिला बस स्टॅण्डवर सोडून आरोपींनी पळ काढला. तरुणी कोचिंगसाठी जात असताना आरोपींनी अपहरण केलं आणि एका शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कोचिंगसाठी जात असताना ही घटना घडली. तरुणी कोचिंगसाठी जात असताना कारमधून आलेल्या आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि एका शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपी आधीच शेतात थांबले होते. त्यांनीही तरुणीवर बलात्कार केला. सर्व आरोपी आपल्याच गावातील असल्याचं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button