breaking-newsराष्ट्रिय

मोदींबरोबर ४३ वर्ष मैत्री होती त्यांनी कधी चहा विकलाच नाही – प्रवीण तोगडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून चरितार्थ चालवण्यासाठी आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे सांगतात. पण नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर माझी ४३ वर्ष मैत्री होती. पण मी त्यांना कधी चहा विकताना पाहिले नाही. फक्त लोकांची सहानुभूति मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी चहा विक्रेत्याच्या प्रतिमेचा वापर करतात असा आरोप तोगडिया यांनी केला.

राम मंदिराच्या मुद्यावरुन त्यांनी आरएसएस आणि भाजपावरही टीका केली. आरएसएस आणि भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही असा आरोप त्यांनी केला. प्रवीण तोगडिया आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष आहेत. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर आरएसएसचे नेते भय्याजी जोशी यांनी पुढच्या पाचवर्षात राम मंदिर बांधले जाणार नाही असे म्हटल्याचे तोगडिया म्हणाले.

भाजपा आणि आरएसएसने १२५ कोटी भारतीयांना अंधारात ठेवले होते पण आता या देशातील हिंदू जागे झाले आहेत. नऊ फेब्रुवारीला हिंदुंच्या नव्या पक्षाची घोषणा होईल. संसदेत एकदा पक्षाला विजय मिळाला की, दुसऱ्याचदिवशी मंदिराचे बांधकाम सुरु होईल असे तोगाडिया म्हणाले.
मोदी संसदेत तिहेरी तलाकसाठी कायदा करतात पण राम मंदिराच्या मुद्यावर ते असा प्रयत्न करताना दिसत नाहीत अशी टीका प्रवीण तोगडिया यांनी केली.

मोदी दुसऱ्यांदा जरी निवडून आले तरी ते राम मंदिर बांधणार नाहीत कारण राम मंदिराचा मुद्दा भाजपा आणि आरएसएससाठी मोठा आधार आहे. एकदा हा विषय संपला की, या दोन्ही संघटनांच्या हाती काही उरणार नाही. त्यामुळे मंदिर न बांधता ते हा विषय जिवंत ठेवत आहेत असा आरोप तोगडिया यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button