breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मोकळ्या जाहिरात फलकांवर गुंडांचा ताबा

दहशतीमुळे जाहिरात ठेकेदार गप्प

शहरातील प्रमुख चौकातील जाहिरातींच्या फलकांची जबाबदारी जाहिरात संस्था तसेच ठेकेदारांकडे सोपविण्यात आलेली असते. जाहिरातदाराचे कंत्राट संपल्यानंतर जाहिरात काढून घेण्यात येते. अशा मोकळ्या फलकांवर वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक गुंडांकडून तसेच स्थानिक राजकीय नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात येतात. अशा जाहिरात फलकांचा गैरवापर करणाऱ्या गुंड तसेच राजकीय नेत्यांच्या दहशतीमुळे जाहिरात ठेकेदार गप्प राहतात.

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातील जाहिरात फलक पडून चौघांचे बळी गेले तसेच अकरा जण जखमी झाले. या घटनेनंतर शहरातील धोकादायक जाहिरात फलक तसेच जाहिरातीचे मोकळे लोखंडी सांगाडय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला. शाहीर अमर शेख चौकातील जाहिरात फलक गेल्या काही दिवसांपासून मोकळे होते. संबंधित जाहिरात संस्थेचा करार संपला होता, तसेच हा फलक रिकामा असल्याने त्याचा सर्वाधिक वापर मंगळवार पेठेतील सर्वपक्षीय राजकीय नेते, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे निदर्शनास आले. साधारणपणे तीन मजली इमारतीएवढा उंच असलेल्या या जाहिरात फलकावर शुभेच्छांचा वर्षांव करणारे फलक नेहमीच झळकायचे. या जाहिरात फलकाची जबाबदारी मध्यरेल्वे प्रशासनाक डे होती.

मध्य रेल्वेतील अधिकारी देखील स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबाबामुळे धोकादायक जाहिरात फलकांवर जाहिरात लावण्यास परवानगी द्यायचे. त्यामुळे अशा फलकांवर कारवाई व्हायची नाही.

शाहीर अमर शेख चौकासह शहरातील अनेक प्रमुख चौकातील मोकळ्या फलकांवर स्थानिक राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते नजर ठेवून असतात. जाहिरात काढल्यानंतर अशा फलकांवर शुभेच्छापर जाहिराती लावून कार्यकर्ते मोकळे होतात. लोखंडी सांगाडय़ावर चढणारे कार्यकर्ते जिवाची पर्वा न करता फलक लावतात.

सर्वाधिक वापर गुंडांकडून

मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातील मध्य रेल्वेच्या जागेत असलेल्या जाहिरात फलकाचा सर्वाधिक वापर मंगळवार पेठ भागात असलेला एक गुंड आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. गुंड व त्याच्या समर्थकांचे वाढदिवसांचे शुभेच्छा फलक तेथे लागायचे. रेल्वे प्रशासनाकडून एकदाही अशा फलकांवर कारवाई करण्यात आली नव्हती, अशी माहिती स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली.

फलकांसाठी मोक्याची ठिकाणे

* शाहीर अमर शेख चौक (मध्य रेल्वेची जागा)

* मालधक्का चौक (मध्य रेल्वेची जागा)

* स. प. महाविद्यालय चौक, टिळक रस्ता

* जेधे चौक, स्वारगेट

* वडगाव बुद्रुक उड्डाण पूल

* अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता

* कर्वे रस्ता पादचारी पूल (एसएनडीटीनजीक)

* वारजे उड्डाण पूल, पृथक बराटे उद्यानानजीक

* चांदणी चौक, मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्ग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button