breaking-newsमनोरंजन

“मेड इन चायना’मध्ये राजकुमार राव

चीनच्या बॉक्‍स ऑफिसवर “हिंदी मिडीयम’च्या यशस्वीनेनंतर निर्माता दिनेश विजन यांनी आणखी एक कॉमेडी चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट एका गुजराती व्यापाऱ्याच्या जीवनातील संघर्ष आणि त्याने मिळविलेल्या यशावर आधारित आहेत. या चित्रपटात व्यापाऱ्याची भूमिका राजकुमार राव साकारणार आहे. दिनेश विजन यांच्या प्रॉडक्‍शन निर्मित आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट “स्त्री’मधील राजकुमार राव याच्या दमदार अभिनयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या चित्रपटाचे नाव “मेड इन चायना’ असे आहे. याचे चित्रिकरण सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटाद्वारे गुजराती दिग्दर्शक मिखिल मुसेल बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे शुटिंग अहमदाबाद आणि चीनमध्ये करण्यात येणार आहे. मिखिल मुसेल यांच्या 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या “रॉंग साइड राजू’ या चित्रपटाला “बेस्ट फिचर फिल्म इन गुजराती’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

राजकुमार राव यानेही सोशल मीडियावर माहिती दिली आहे. राजकुमार रावने आपल्या ट्विटर हॅंडलवर लिहिले की, “स्त्री’नंतर दीनू आणि मैडॉक फिल्म्ससोबत पुन्हा एकदा “मेड इन चायना’चा हिस्सा बनल्याने मी खूप रोमांचित आहे. या रोमांचक यात्रेचा प्रवास सुरू करण्यासाठी आता जास्त वाट पाहू शकत नाही, असे त्याने लिहिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button