breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो पुणेकरांच्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवेल – डाॅ. ब्रिजेश दीक्षित

पुणे –  अद्धयावत तंत्रद्धनाने परिपूर्ण स्मार्ट मेट्रो पुणेकरांच्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवेल, असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यू. इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे शनिवारी भोसरी येथील, अंकुश राव लांडगे सभागृह येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित अभियंता दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दीक्षित बोलत होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज वर उत्तम दर्ज्याचे कार्य आणि विविध पप्रकल्पाची चांगल्यारीत्या या ठिकाणी उभारणी केली आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात अग्रगण्य असून मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण या ठिकाणी होत असून आता शहराची वाटचाल स्मार्ट सिटी कडे अग्रेसर आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी आता पर्यंत मेट्रो रेल प्रकल्पाचे ३०% वाह्याडव्क्ट चे कार्य कमी वेळेत पूर्ण झाले असून या रिच ची कार्य झपाट्याने आणि उत्तम गुणवत्ता पूर्वक पद्धतीने केल्या जात आहे,कुठल्याही प्रकारच्या गुणवतेला तडजोड करून केली जाणार नाही हे प्रामुख्याने डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
पुणे शहरात मेट्रो रेल्वेचे एकूण ३१.२५४ किंमी लांबीच्या दोन मार्गावर एकूण ३० स्थानके राहणार आहेत. कमीत कमी खर्चात प्रकल्प साकारण्यावरभर देण्यात येत असून  देशातील अन्य प्रकल्पाच्या त्रुटी लक्षात घेऊन त्या टाळण्यात येईल. या प्रकल्पात सिग्नलिंग व वाहतुकीची व्यवस्था स्वयंचलित राहणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षेच्या विषयावर लक्ष दिले जाईल. फिडर बससेवा, तिकीटांसाठी  स्मार्टकार्ड,कॉमन मोबिलीटी कार्ड आदी अध्यावत सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. बांधकामाशी संबंधित माहिती व कामावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य झाले आहे.
महापौर राहुल जाधव म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे शहराची रचना उत्तमरीत्या केली असून,येथील अभियंत्यांनी चिकाटीने चांगले काम व सुंदर असे शहर बनविले आहे. शहर घडविण्यास सर्वांचे योगदान अमुल्य असून शहरातील रस्ते,उड्डाणपूल जगाच्या नकाशावर आहे. आता मेट्रोचे निर्माण कार्य या ठिकाणी होत असून आपण हे शहर जगाच्या इतिहासावर स्मार्ट असे शहराचे निर्माण करुया व या करता आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
या प्रसंगी शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यू. इंजिनिअर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री.जय गुजर,शहर अभियंता श्री. राजन पाटील,सह शहर अभियंता श्री. आयुब खान पठान,श्री.प्रवीण तुपे, कार्याध्यक्ष श्री. सुनील बडगावकर,सचिव श्री. संतोष कुंदळे प्रामुख्याने उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button