breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मेट्रो’साठी पालिकेने आर्थिक साहाय्य करावे

महानगर आयुक्तांचे नगरविकास विभागाला पत्र; १६ हजार कोटींची मागणी

मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने मुंबईत आखलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या खर्चाचा काही भाग महापालिकेने उचलावा व या खर्चापोटी दहा वर्षांत १६ हजार कोटी एमएमआरडीएला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी नगरविकास विभागांच्या सचिवांना पत्र लिहून पालिका आयुक्तांना तसे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे. पालिकेचा महसूल आधीच कमी झालेला असताना एमएमआरडीने केलेल्या या मागणीमुळे पालिकेचे कंबरडे मोडले आहे.

एमएमआरडीएने मुंबईत एकूण सात विविध मार्गावर मेट्रोचे प्रकल्प आखले आहेत. तसेच दळणवळण सुधारण्यासाठी त्यांची अन्य अनेक विकासकामे सध्या मुंबईत सुरू आहेत. मेट्रो लाइन १ हा वर्सोवा घाटकोपर मार्ग सध्या तयार असून त्यावरून ४ लाख प्रवासी रोज प्रवास करत आहेत. येत्या काळात आणखी आठ ते नऊ नवे मार्ग (लाइन) तयार होणार आहेत. यापकी बरेचसे मार्ग हे मुंबईच्या हद्दीतून जातात. या मार्गामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला आर्थिक साहाय्य करावे अशी मागणी एमएमआरडीएने केली आहे. प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के रक्कम महापालिकेने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम १६ हजार ६६४ कोटी इतकी आहे.

पालिका प्रशासनाकडे तसे पत्र पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी एमएमआरडीएने पालिकेकडे याच कारणास्तव सुमारे ८,६२९ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी हा निधी देण्यास पत्राद्वारे नकार दिला होता.

पालिकेचा महसूल विविध कारणांमुळे कमी झाला असून पालिकेचे आधीच अनेक मोठमोठे प्रकल्प सुरू असून त्याकरिता निधीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी त्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे या वर्षी महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर यांनाच पत्र लिहून पालिकेला तसे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button